+31 6 42283897 / +31 6 18164344

युरोपियन एकांकिका स्पर्धा २०२६

Event Image


🎭 कल्पनांचे पंख, शब्दांचे सामर्थ्य, अभिनयाची जादू! तुमच्यातील कलाकाराला रंगमंचावर आणण्याची सुवर्णसंधी!" 🎭

अभिमंच प्रस्तुत- ‘युरोपियन एकांकिका स्पर्धा २०२६’ मध्ये सहभागी व्हा आणि रंगमंच गाजवा.! ✨

युरोपातील मराठी नाट्यसंस्कृती अधिक समृद्ध करण्यासाठी आणि नव्या पिढीतील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अभिमंच-नेदरलँड्स घेऊन येत आहे हा रंगोत्सव! मराठी सांस्कृतिक संस्था, विद्यार्थी गट आणि हौशी नाट्यगट या स्पर्धेत आपली एकांकिका सादर करून सहभागी होवू शकतात.

मराठी रंगभूमीचा हा उत्सव अनुभवायला नक्की या! ✨

📅 तारीख : ४ – ५ एप्रिल २०२६
📍 स्थळ : Utrecht, नेदरलँड्स
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
Register

Meet the team

  • Prasad Sawant

    Advisory
  • Milind Chavan

    Management
  • Tejal Nachane

    Management
  • Reeta Kote

    Management
  • Ashwini Mulekar

    Administration
  • Meenal Mane

    Promotion
  • Nilesh Puranik

    Sponsorship

Frequently Asked Questions

साधारणपणे 35 ते ४५ मिनिटे. वेळ मर्यादा ओलांडल्यास गुणकपात होऊ शकते.

एकांकिकेचं मराठी भाषेत सादरीकरण अपेक्षित आहे.

मर्यादा नाही.

हो. स्वतःची मूळ एकांकिका किंवा प्रसिद्ध लेखकाची एकांकिका – दोन्ही चालतात. मात्र प्रकाशित नाटक असेल तर लेखकाचे नाव नमूद करणे बंधनकारक आहे. आणि मूळ लेखकाची, दिग्दर्शकाची परवानगी घेण्याची जबाबदारी तुमच्या टीमने घ्यावी.

हो. प्रवेश शुल्क 100 Euro आकारण्यात येईल.

प्रत्येक टीमने निवासाची सोय स्वतः करणे अपेक्षित आहे. यासाठी लागणारी मदत आमच्याकडून करण्यात येईल.

थिएटरकडून टेबल खुर्ची आणि Abhimach तर्फे window door frames पुरविण्यात येतील. त्या व्यतिरिक्त लागणार्‍या properties प्रत्येक टीमने आणणं गरजेचं आहे.

हो. माहिती आधी देणे गरजेचे आहे.

हो, असणार आहे. तुमची एकांकिका प्राथमिक फेरीत निवडून आली तर अंतिम फेरीत पुन्हा सादरीकरण करावं लागेल.

थिएटरकडून प्रकाश आणि ध्वनी व्यवस्था पुरविण्यात येईल. Light Plan कार्यक्रमाच्या तारखेच्या २ महिने आधी आयोजकांना देणे आवश्यक आहे.

हो. पण प्रत्येक टीमचा स्वतः चा operator उपस्थित असणं अत्यावश्यक आहे.

हो. परीक्षकांनची माहिती लवकरच पुरविण्यात येईल.

नाही.

नाही.

नाही. पण थिएटरच्या restaurent मध्ये जेवण आणि स्नॅक्सचे पर्याय उपलब्ध आहेत.

नाही, अर्जामध्ये नाव नमूद असलेल्या टीमच्या सदस्यांना तिकीट विकत घेणे आवश्‍यक नाही.

थिएटर च्या आवारात सोय नाही पण आजूबाजूला मुबलक मोफत पार्किंग उपलब्ध आहे.

हो. थिएटर पासून 2 मिनिटांच्या अंतरावर बसस्थानक ( Utrecht Prins Bernhadplein) आहे. Utrecht Centraal train station पासून 3,12,7 नंबर च्या बसने ईथे पोहोचता येते.